आग्रा : आग्र्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी शुक्रवारी रोड शो केला. या दौऱ्यात दोन्ही नेत्यांचा लोकांकडून भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे राहुल गांधी यांना रोडशोदरम्यान अनेक तरुणींकडून चिठ्ठ्या येत होत्या. राहुल गांधी या चिठ्ठ्या घेत, त्या वाचून हसत आणि खिशात ठेवत. या सर्व चिठ्ठ्यांचा खुलासा अद्याप झालेला नाहीये मात्र खंदारी येथील आकांक्षा नावाच्या तरुणीची चिठ्ठी खास होती.
या चिठ्ठीत आकांक्षाने राहुल यांना लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर म्हणून राहुल केवळ हसले. राहुल यांना दयालबागमधील स्वामीबाग मंदिराजवळ रोडशो करताना पहिली चिठ्ठी मिळाली. दुसरी चिठ्ठी न्यू आग्रा ठाण्याजवळ, तिसरी चिठ्ठी हरिपर्वत आणि चौथी चिठ्ठी छिपीटोला रोड येथील प्रचारादरम्यान मिळाली.