नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांची ही चौकशीची प्रक्रिया सर्वसामान्य असल्याचा खुलासा, दिल्लीच्या पोलीस आयुक्त बी एस बस्सी यांनी केला आहे. या चौकशीचा केंद्र सरकार तसंच केंद्रीय गृहमंत्रालयाचा काहीही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
राहुल गांधी कसे दिसतात असा प्रश्न दिल्ली पोलिसांना पडलाय. दिल्लीतील काँग्रेसच्या कार्यालयात भेट देत दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींच वर्णन करायला सांगितल्याचं समोर येतंय. यावरून काँग्रेस चांगलीच संतप्त झालीये. दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली.
दिल्ली पोलिसांचा पुतळाही यावेळी जाण्यात आला... दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींच्या कार्यालयाला भेट दिली होतील त्यावेळी पोलिसांनी राहुल गांधीचे केस, डोळे, रंग कोणता, त्यांच्या शारिरिक ठेवणीचं वर्णन करायला सांगितलं. पोलिसांनी राहुल गांधींच्या कार्यालयाला भेट देत केलेल्या या चौकशीबाबत काँग्रेसनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राहुल गांधी खासदार असल्यामुळे त्यांच्याबाबत माहिती आणि फोटो इंटरनेटवर सहज उपलब्ध होतात, असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलंय. नेमके राहुल गांधी आत्मचिंतन शिबिराला गेलेले असतानाच पोलिसांनी ही चौकशी का केली असा सवालही काँग्रेस पदाधीका-यांकडून विचारला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.