रेल्वेत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेल्वेचा अलर्ट

उत्तर प्रदेशात राजधानी एक्सप्रेसमध्ये दहशतवादी घुसण्याच्या अफवेनं गोंधळ झाल्यानंतर गुरूवारी रेल्वे महासंचालकांनी राज्यात दहशतवादी घटनांबद्दल अलर्ट जारी केलाय. या अंतर्गत रेल्वेच्या सर्व स्टेशन्सवर अलर्ट राहण्याचे आदेश दिले गेलेत.

Updated: Oct 15, 2015, 05:43 PM IST
रेल्वेत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेल्वेचा अलर्ट title=

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात राजधानी एक्सप्रेसमध्ये दहशतवादी घुसण्याच्या अफवेनं गोंधळ झाल्यानंतर गुरूवारी रेल्वे महासंचालकांनी राज्यात दहशतवादी घटनांबद्दल अलर्ट जारी केलाय. या अंतर्गत रेल्वेच्या सर्व स्टेशन्सवर अलर्ट राहण्याचे आदेश दिले गेलेत.

रेल्वे महासंचालक जावेद अहमद यांच्यानुसार, जीआरपीच्या सर्व 65 स्थानकांवर अलर्ट जारी करण्यात आलंय. कानपूर, मुरादाबाद, बरेली, गोरखपूर, इलाहाबाद, वाराणसी आणि मथुराहून चालणाऱ्या ट्रेन्सवर नजर ठेवण्याचे आदेश दिले गेले आहेत. 

आणखी वाचा - आता वेटिंगचं टेंशन संपलं, प्रत्येकाला मिळणार कन्फर्म तिकीट

काही दिवसांपूर्वी फर्रूखाबाद रेल्वे स्टेशन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली. रेल्वेरूळाला नुकसान पोहोचवण्याच्या अनेक घटनाही समोर आल्या होत्या. अशा घटनांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची झोप उडालीय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच घटनांमुळं सणासुदींच्या दिवसात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अलर्ट जारी करण्यात आला. 

आणखी वाचा - रेल्वे अपघात झाल्यास प्रवाशाला मिळणार भरपाई, एलआयसीबरोबर करार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.