हिमाचल प्रदेशात पर्यटकांचे प्रचंड हाल

हिमाचल प्रदेशमध्ये रोहतांगपास इथं सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. मात्र तिथं टॅक्सी आणि ऑटो संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतायत.

Updated: May 27, 2015, 04:54 PM IST
हिमाचल प्रदेशात पर्यटकांचे प्रचंड हाल title=

रोहतांगपास : हिमाचल प्रदेशमध्ये रोहतांगपास इथं सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. मात्र तिथं टॅक्सी आणि ऑटो संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतायत.

यात महाराष्ट्रातलेही शेकडो पर्यटक अडकून पडलेत. राज्य परिवहन सेवेवर संपूर्ण विसंबून रहावं लागत असल्यामुळे पर्यटकांचा प्रचंड खोळंबा होतोय. बस स्टॉपवर प्रचंड गर्दी आहे. 

२० तारखेपासून हा संप सुरू आहे. येत्या काही दिवसांत हा संप मिटण्याची शक्यताही नसल्यामुळे पर्यटकांचा जीव टांगणीला लागलाय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.