नवी दिल्ली : एका ऑडीट रिपोर्टच्या अहवालानुसार, टेलिकॉम कंपनी रिलायंसने गेल्या तीन वर्षात आपलं एकुण उत्पन्न असलेल्या रुपयांपेक्षा जवळपास ६३ करोडने कमी दाखवलं आहे.
रिलायंसने परदेशी कंपन्यांकडून मिळणाऱ्या नफ्याला आपल्या या उत्पन्नात जोडून दाखवलं नाहीये. परदेशी चलन बदलत असताना होणारा फायदा कंपनीने लपवून ठेवला आणि त्यामुळे कंपनीला लायसंस चार्जेस कमी भरावे लागल्याचं पोस्ट तसेच दूरसंचार कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
यांच्या कार्यालयाकडून रिलायंस जियोच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यातूनच हा प्रकार उघडकीस आला.