नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच १० रुपयांच्या नव्या नोटा आणत आहेत. आरबीआय महात्मा गांधी सिरीज २००५अंतर्गत नव्या नोटा आणणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जुन्या नोटांच्या तुलनेत या नोटांमध्ये अधिक सुधारणा असेल.
दहा रुपयांच्या या नव्या नोटांवर नंबर पॅनेलच्या इनसेटमधील इंग्रजी एल हे अक्षर असेल आणि नोटाच्या पाठीमागी २०१७ असे लिहिलेले असेल. त्यासोबतच आरबीआयचे गर्व्हनर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.
या नोटांवरील दोन्ही नंबर पॅनेलमधील पहिल्या तीन अंक वा अक्षरांचा आकार स्थिर असेल त्यानंतर उजवीकडून डावीकडच्या दिशेने अंकाचा आकार वाढत जाईल. दरम्यान, या नव्या नोटा चलनात येणार असल्या तरीही जुन्या नोटा चलनात कायम राहणार असल्याचे बँकेने स्पष्ट केलेय.
गेल्या वर्षी ८ नोव्हेंबरला मोदी सरकारने जुन्या ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता. नोटाबंदीनंतर सरकारकडून मोठ्या प्रमाणात डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन दिले जात होते.
Issue of ₹ 10 banknotes with improved security featureshttps://t.co/x33Gc1nrHP
— ReserveBankOfIndia (@RBI) March 9, 2017