दाऊदला पाकिस्तानात घुसून मारण्याचा प्लान होता, पण...

भारताने पाकिस्तानात लपलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला, पाकिस्तानात घुसून दाऊदला मारण्याचा प्लान आखला होता, ही प्लान गुप्त होता, मात्र मुंबई पोलिसांमधील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे असं करणे शक्य झालं नाही. हे स्पष्टीकरण भाजपचे खासदार आणि माजी गृह सचिव आरके सिंह यांनी दिलं आहे.

Updated: Aug 24, 2015, 03:43 PM IST
दाऊदला पाकिस्तानात घुसून मारण्याचा प्लान होता, पण... title=

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानात लपलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला, पाकिस्तानात घुसून दाऊदला मारण्याचा प्लान आखला होता, ही प्लान गुप्त होता, मात्र मुंबई पोलिसांमधील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे असं करणे शक्य झालं नाही. हे स्पष्टीकरण भाजपचे खासदार आणि माजी गृह सचिव आरके सिंह यांनी दिलं आहे.

आर के सिंह यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे, मुंबई पोलिसांतील काही लोग दाऊदशी संगनमत करतात. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा दाऊदला भारतात आणण्याची योजना आखण्यात आली होती.

दाऊद इब्राहिमला परत आणण्यासाठी लपून हल्ला करण्याचंही त्यांनी समर्थन केलं आहे. वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा दाऊदचा खात्मा करण्यासाठी भारत सरकारने काही लोकांना ऑपरेशनशी जोडून घेतलं होतं, त्यांना गुप्त ठिकाणी ट्रेनिंगही देण्यात आलं होतं.

मात्र दाऊदसोबत छुप्याने संबंध ठेवणारे काही पोलिस अधिकारी या ट्रेनिंग कॅम्पवर या ट्रेनर्सनला अटक करण्याठी पोहोचले. आर के सिंह यावर पुढे बोलतांना म्हणाले की, मुंबई पोलिसांनी या लोकांना अटक करतांना सांगितलं की, तुम्हाला अटकेचं आमच्याकडे अटक वॉरंट आहे. या अधिकाऱ्यांमुळेच सर्व ऑपरेशन फोल ठरलं, मात्र यावर सिंह पुढे असंही म्हणतात की, ही गोष्ट आपण स्पष्ट करू शकत नाही, किंवा दुजोरा देऊ शकत नाही.

भारताला इस्त्राईल सारखं वागावं लागेल नाहीतर लोक आपल्या देशात येऊन आपलं नुकसान करतील, असंही सिंह यांनी सांगितलं, तसेच सिंह याचं दाऊदवरील वक्तव्य अशा वेळी येत आहे, जेव्हा एनएसए वार्ता रद्द झाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x