नवी दिल्ली : रुपयाच्या मुल्यामध्ये आज सलग आठव्या दिवशी घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात रुपयाचं मुल्य २४ पैशांनी घसरलं आणि एका डॉलरचा दर ६५ रुपये ३४ पैशांवर गेलाय.
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरला असलेली मागणी आणि गेल्या आठवड्यात चीननं युआनचं मुल्य घटवल्याचा दबाव रुपयावर आहे. देशात आयातदार आणि बँकांची मागणीही वाढत असल्यामुळे रुपयाची घरसण झाली.
दुसरीकडे शेअऱ बाजारात आजची सकाळ पॉझिटीव्ह झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय. सकाळच्या वेळात सेन्सेक्समध्ये साडेतीनशे अंशांची उसळी बघायला मिळाली... वेदांता, सन फार्मा, बजाज ऑटो, रिलायन्स, HDFC हे शेअर्स ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.