रुपयाची रसातळाकडे वाटचाल...

रुपयाची ऐतिहासिक घसरण सुरूच आहे. रिझर्व बँकेच्या हस्तक्षेपानंतरही रुपयाची रसातळाकडे वाटचाल सुरू आहे. आज सकाळी बाजार सुरू होताच रुपयाचं मूल्य ६५.१० वर पोचले. तीन महिन्यात रुपयाची 17 टक्के घसरण झालीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 22, 2013, 10:18 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
रुपयाची ऐतिहासिक घसरण सुरूच आहे. रिझर्व बँकेच्या हस्तक्षेपानंतरही रुपयाची रसातळाकडे वाटचाल सुरू आहे. आज सकाळी बाजार सुरू होताच रुपयाचं मूल्य ६५.१० वर पोचले. तीन महिन्यात रुपयाची 17 टक्के घसरण झालीय.

आज रुपयानं पासष्ठीच गाठलीय. इतकी नीचांकी पातळी रुपयानं पहिल्यांदाच दाखवली आहे. रुपयाचे मूल्य बुधवारी सायंकाळी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ६५.४५ होतं. आज ते आणखी खाली आलंय. रिझर्व्ह बॅंकेनं उपाययोजनेसाठी सरकारी बॅंकांच्या मार्फत डॉलरची विक्री केल्याने तो काहीसा सावरला. पण रिझर्व्ह बँकेकडून उपययोजना करूनही रुपयाचं अवमूल्यन सुरूच आहे.

आयातदारांकडून डॉलरचा मोठी मागणी, परकी गुंतवणूकदार संस्थांकडून (एफआयआय) काढून घेतला जाणारा मोठा निधी आणि फेडरल रिझर्व्हकडून बाँडखरेदी बंद केली जाण्याच्या अपेक्षेमुळं एफआयआयनी भारतात गुंतवणुकीबाबत घेतलेला सावध पवित्रा या सर्वांचा परिणाम रुपयाच्या अवमूल्यनावर होत आहे. रिझर्व्ह बँकेकडून काही उपययोजना करूनही रुपयाचे अवमूल्यन सुरूच आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.