www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आध्यात्मिक गुरु आसाराम बापू पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. आसाराम बापूंच्याविरोधात दिल्लीच्या कमनला नगरमध्ये लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोधपूरच्या एका अल्पवयीन मुलीनं आसाराम बापूंविरोधात तक्रार दाखल केलीय. त्यामुळे आसाराम बापूंना अटक होण्याची शक्यता आहे.
जोधपूरच्या एका अल्पवयीन मुलीनं तक्रार केल्यावर, कमला मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ही मुलगी आसाराम बापूंच्या गुरुकुलात शिक्षण घेत होती. जोधपूरमधील आसाराम बापूंच्या गुरूकुलमध्ये ही मुलगी शिक्षण घेत असतांना, या काळात आसाराम बापूंनी अनेकवेळा आश्रमात बोलवून लैंगिक शोषण केल्याचा या मुलीचा आरोप आहे.
दिल्ली पोलिसांनी याबाबत जोधपूर पोलिसांना माहिती दिली आहे. या मुलीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटलंय, की आसाराम बापूंच्या आश्रमात त्यांच्यासह अनेकांनी माझं लैंगिक शोषण केलंय. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, या मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ