सल्या आणि बाळ्या एअर होस्टेसला पाहून म्हणाले...

सैराट सिनेमाती तानाजी आणि सल्ल्याने हैदराबादला जाताना पहिला विमान प्रवास केला, यानंतर त्यांनी आपला अनुभव त्यांनी मीडियाला सांगितला.

Updated: Jun 28, 2016, 09:52 AM IST
सल्या आणि बाळ्या एअर होस्टेसला पाहून म्हणाले...

हैदराबाद : सैराट सिनेमाती तानाजी आणि सल्ल्याने हैदराबादला जाताना पहिला विमान प्रवास केला, यानंतर त्यांनी आपला अनुभव त्यांनी मीडियाला सांगितला.

तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख (सल्ल्या-बाळ्या) यांनी पुणे ते हैदराबाद असा विमान प्रवास केला, हैदराबादेत सैराटच्या प्रिमिअर शोसाठी सल्ल्या-बाळ्या गेले होते.

यावर मीडियाने त्यांना विमानात एअर होस्टेस पाहिल्या का? अशी फिरकी टाकल्यावर,  या प्रश्नावर दोघांनीही हसत-लाजत का असेना हो म्हटले. एअर होस्टेस मस्त होत्या, भारी होत्या अशी साधी-सरळ प्रतिक्रियाही त्यांनी दिली. 

प्रदीप आणि अरबाज हे सतत विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहत होते, विमानातून आकाश आणि आकाशातून हजारो फुटाच्या उंचीवरून कसं दिसतं हे प्रदीप आणि अरबाज न्याहाळत होते. तसेच विमानात बसल्यानंतर लय भारी वाटल्याचे तानाजीने सांगितलं.