नवी दिल्ली : विदेशातील बँकांमध्ये ठेवलेल्या काळ्या पैशांच्या बाबतीत भारत सरकारला थोडंफार यश मिळालं आहे. काळा पैसा भारतात कधी येणार हे माहित नाही पण यासंबंधित माहिती सरकारच्या हाती लागली आहे. इनकम टॅक्स अॅथॉरिटीने आता पर्यंत 13 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक काळ्या पैशाची माहिती मिळवली आहे. फक्त दोन स्टेप्समध्ये मिळालेल्या प्रयत्नात सरकारला ही माहिती मिळाली आहे.
इनकम टॅक्स विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिनेव्हाच्या एचएसबीसी बँकमध्ये 400 भारतीयांचे खाते आहेत. या खात्यांमध्ये 8,186 कोटी रुपये आहेत. विदेशातील खात्यांमध्ये असलेल्या काळा पैशांच्या बाबतीतही मोठी माहिती मिळाली आहे. 31 मार्च 2016 पर्यंत या खातेधारकांकडून 5,377 कोटींच्या टॅक्सची मागणी केली गेली आहे.
2011 मध्ये फ्रांस सरकारने HSBC जिनिवा बँकेत असलेल्या भारतीयांच्या खात्यांची माहिती भारत सरकारला दिली होती. 2013 मध्ये इंटरनॅशनल कॉनशोर्शियम ऑफ इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट्स यानी ICIJ च्या वेबसाइटवर 700 भारतीयांची विदेशातील बँकांमध्य़े अकाउंट असल्याचा खुलासा केला होता. ज्यामध्ये 5000 कोटी रुपये जमा असल्याचं म्हटलं होतं. 1100 बँक अकाउंट्स मध्ये 13000 कोटीचा काळा पैसा जमा असल्याचा खुलासा केला गेला होता.
आता 13000 कोटींचा काळा पैसा विदेशातील बँकांमध्ये असल्याचा खुलासा झाला आहे. आयकर विभागाने यावर कारवाई सुरु केली आहे. आयकर विभागाने विदेशातील बँकांमध्ये अकाउंट असणाऱ्यांची नावे समोर आली आहेत त्यापैकी अनेकांनी ब्लॅक मनी डेकलेरेशन विंडो कायद्यानुसार संपत्तीचा खुलासा केला आहे. सरकारने मागच्या वर्षी अशा व्यक्तींना लवकरात लवकर संपत्तीची माहिती देण्याचा इशारा दिला होता.