मतदान ओळखपत्र असूनही या सलमानला मतदान करु दिलं नाही

सलमान खान हा नेहमी चर्चेत असणारा बॉलीवूडचा सर्वात मोठा कलाकार आहे. त्यामुळे कधी कधी त्याच्या फोटोवरूनही चर्चा रंगायला लागतात. असाच एक किस्सा घडलाय हैदराबादमध्ये. 

Updated: Feb 2, 2016, 10:43 PM IST
मतदान ओळखपत्र असूनही या सलमानला मतदान करु दिलं नाही title=

हैदराबाद : सलमान खान हा नेहमी चर्चेत असणारा बॉलीवूडचा सर्वात मोठा कलाकार आहे. त्यामुळे कधी कधी त्याच्या फोटोवरूनही चर्चा रंगायला लागतात. असाच एक किस्सा घडलाय हैदराबादमध्ये. 
 
एका मतदाराच्या ओळखपत्रावर चक्क बॉलीवूडचा दबंग खान सलमान खानचं नाव आणि फोटो आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सलमानचा फोटो पाहून मतदान केंद्रावरील अधिकारीही अवाक झाले. ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान होत असतानाच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

गोवालीपुरा येथे मतदानासाठी आलेल्या एका इसमाचे व्होटर आयडी सर्वांनांच धक्का बसला. त्याच्या व्होटर आयडीवर चक्क अभिनेता सलमान खानचे नाव आणि फोटो होता. तसेच त्याच्या वडिलांच्या नावासमोरही सलीम खान यांचे नाव होते.

महत्वाची गोष्ट म्हणजे या सलमान खानचे वय ६४ वर्ष दाखवण्यात आले होते. पण अधिका-यांनी मात्र त्या व्यक्तीस मतदान करू दिले नाही. मुंबईतील सलमान खानचे हैदराबादमधील हे मतदान कार्ड दिवसभरात सर्व सोशल नेटवर्किंग साईट्सवर व्हायरल झाले.