हैदराबाद : बहुचर्चित ‘सत्यम’ घोटाळ्यातील प्रमुख आरोपी बी. रामलिंग राजू तसंच इतर आरोपींना एका स्थानिक न्यायालयानं दोषी ठरवलंय. गंभीर फसवणुकीच्या आरोपाखाली चौकशी कार्यालयानं (एसएफआयओ) केलेल्या तक्रारींवर न्यायालयानं हा निर्णय सुनावलाय.
न्यायालयानं राजू तसंच या घोटाळ्याशी संबंधित इतर सहा जणांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. तसंच सर्व आरोपींवर दंडही लावण्यात आलाय.
कंपन्यांसदर्भातील प्रकरणात मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या ‘गंभीर फसवणूक तपास कार्यालय’नं (एसएफआयओ) ‘सत्यम कम्प्युटर सर्व्हिसेस’च्या माजी संचालकांविरुद्ध आर्थिक घोटाळ्यासाठी विशेष न्यायालयात कंपनी कायद्याच्या नियमांच्या उल्लंघनाच्या सात तक्रारी डिसेंबर २००९ मध्ये नोंदवल्या होत्या.
याच प्रकरणात, राजू आणि काही संचालकांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. तसंच प्रत्येकी १०,००० रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावण्यात आलाय. तर इतर तक्रारींवर केवळ दोन दंड लावण्यात आलेत.
न्यायालयानं माजी संचालकांपैंकी एक कृष्णा. जी. पलेपू यांच्या तक्रार क्रमांक ३९४२००९ मध्ये दोन महिन्यांच्या आत २.६६ करोड रुपये दंड भरण्याचे आदेश दिलेत.
उल्लेखनीय म्हणजे, सध्यातरी राजू जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.