गरीबी मुळं मॉडेलची सोशल मीडियावर देह विक्रीची पोस्ट

गुजराती चित्रपटात अभिनयकरणाऱ्या आणि मॉडलींग करणाऱ्या एका तरुणीनं गरीबीला कंटाळून देहविक्री करण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे. 

Updated: Nov 29, 2014, 10:13 AM IST
गरीबी मुळं मॉडेलची सोशल मीडियावर देह विक्रीची पोस्ट title=

सुरत: गुजराती चित्रपटात अभिनयकरणाऱ्या आणि मॉडलींग करणाऱ्या एका तरुणीनं गरीबीला कंटाळून देहविक्री करण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे. 

वडोदऱ्यात राहणाऱ्या या मॉडेलने आपल्या सोशल मीडिया साइटवर लिहलं आहे की, "गरीबीपुढं मी हात टेकले असून मी माझ्या शरीराची बोली लावत आहे. माझ्या घरी माझी आई गेली अनेकवर्षे अर्धांगवायुने बिछान्याला खिळून आहे. तर, वडिलांना अपघातात दोन्ही पाय गमवायला लागले असून कुठे कामाकरता विचारले असता लोक शारिरीक संबंधाबद्दल मागणी करतात, माझ्या पुढे पर्याय नसल्याने मी हा मार्ग निवडत आहे," असं या मॉडेलनं सोशल मीडियावर लिहलं आहे. 

तसंच संपर्काकरता तीनं आपला मोबाईल नंहरही दिला आहे. या मॉडेलाच्या जाहीर देह विक्रीच्या बातमीनं गुजारतमधील राज्य महिला आयोगाला खडबडून जाग आली असून आयोगाच्या अध्यक्ष लिलाबेन अंकोलिया यांनी असं सांगितलं की, राज्यातील रुग्णालये ही अद्यावत असून पीडित महिला आपली समस्या आमच्याकडे मांडू शकते. तसंच आम्ही सर्व प्रकारची मदत करायला तयार आहोत असेही त्या म्हणाल्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.