संसद भवनाच्या सुरक्षेमध्ये घोडचूक

संसद भवनाच्या सुरक्षेमधली घोडचूक समोर आली आहे. प्रदीप कुमार नावाची एक व्यक्ती संसद भवनामध्ये पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Updated: Mar 11, 2016, 04:05 PM IST
संसद भवनाच्या सुरक्षेमध्ये घोडचूक

नवी दिल्ली: संसद भवनाच्या सुरक्षेमधली घोडचूक समोर आली आहे. प्रदीप कुमार नावाची एक व्यक्ती संसद भवनामध्ये पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

पंतप्रधानांकडे आपण नोकरी मागायला आलो असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचलेल्या प्रदीप कुमारनं दिली आहे. 

25 वर्षाच्या प्रदीपला सकाळी 7 वाजता पोलिसांनी पकडलं. कोणत्याही चौकशीशिवाय प्रदीप पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचला. पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये प्रदीपची आता चौकशी सुरु आहे. स्थानिक पोलीस, स्पेशल सेल आणि आयबीकडून या तरुणाची चौकशी सुरु आहे. 

प्रदीप कुमार हा कानपूरचा रहिवासी असून त्याच्याकडून काही कागदपत्र, 12 वीचं सर्टिफिकेट पोलिसांनी जप्त केली आहेत. मी सध्या रिक्षा चालवतो, पण पंतप्रधानांना भेटल्यामुळे मला नोकरी मिळेल, त्यासाठी मी आलो, असल्याची प्रतिक्रिया प्रदीपनं दिली आहे.