www.24tass.com , झी मीडिया, मुंबई
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचा दर आज 61.51 इतका घसरलाय. गेल्या काही दिवसांपासून सतत घसरणाऱ्या भारतीय रुपयानं आज आपल्या नीचांकी पातळी गाठल्याची माहिती मिळालीय. याआधी 8 जुलैला रुपया 61.21 इतका खाली घसरला होता. भारतीय रुपयाची आत्तापर्यंतची ही नीचांकी पातळी आहे.
रुपयामध्ये सतत चालू असलेल्या या घसरणीमुळं आता रिझर्व्ह बॅंकेकडून याबद्दल अधिक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यतता वर्तविली जातेय. तसंच सतत घसरणाऱ्या रुपयाच्या पार्श्व भूमीवरही रिझर्व्ह बॅंक आणि सरकारनं विकासावर लक्ष केंद्रित करावं, अशी अपेक्षा बाजारपेठेतून व्यक्त होतेय.
दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या झालेल्या घसरणीचा परिणाम बीएसई आणि निफ्टीवरही झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.