www.24taas.com, झी मीडिया, गोलपारा
आसामच्या गोलपारा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात ७ जण ठार, तर १० जण जखमी झालेत. गारो नॅशनल लिबरेशन आर्मी या आसामी दहशतवादी संघटनेनं हा हल्ला केलाय.
काल रात्री ही घटना घडली, गेंदाबारी या दुर्गम खेड्यात दिवाळीनिमित्त १५-१६ जण जुगार खेळत होते. त्याच वेळी अतिरेकी तिथं आले आणि ऑटोमॅटिक रायफल्समधून त्यांनी बेछूट गोळीबार केला. जखमींना गोलपाराच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला गारो नॅशनल लिबरेशन आर्मीच्या (जीएनएलए) दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची शक्यता आहे. आसाम-मेघालयाच्या सीमेवर हे गाव आहे. निवडणुकीमुळं गेल्या महिनाभरापासून इथं तणावाचं वातावरण आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.