नवी दिल्ली : गुजरातमध्ये आजपासून म्हणज एक ऑगस्टपासून ७वा वेतन आयोग लागू झालाय. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी सातवा वेतन लागू झाल्याची घोषणा करून सरकारी कर्मचा-यांना खूष केलं आहे.
एकूण आठलाख ७७ हजार कर्मचा-यांना याचा लाभ मिळणार आहे. यापैकी ४ लाख १२ हजार पेन्शनर्स आहेत तर चार लाख ६५ हजार सध्या कार्यरत असलेले कर्मचारी आहेत.
केंद्रीय कर्मचा-यांना सातवा वेतन १ जानेवारीपासून लागू झालेला आहे. क्लास ४ आणि क्लासवन अधिका-यांच्या पगारामध्ये या वेतन आयोगानुसार १४.६० टक्के ते २५ टक्के इतकी वाढ झाली आहे.
सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर सहा हजार कोटींचे अधिकचा बोजा गुजरात सरकारवर पडणार असल्याचे गुजरातचे अर्थमंत्री सौरभ पटेल यांनी सांगितलं आहे. तर महाराष्ट्रात सातवा वेतन केव्हापासून लागू होणार याची लाखो कर्मचारी अजूनही वाट पहात आहेत.