शाहरुखने टाकलं पंतप्रधान मोदींना मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहतावर्ग देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहे. फोर जी जमान्यातल्या ट्विटरवरही मोदींचे फॉलोअर्स काही कमी नाहीत. गेल्या वर्षी मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रं स्विकारल्यानंतर मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या तब्बल चौपटीनं वाढली आहे. 

Updated: Dec 7, 2015, 11:04 PM IST
शाहरुखने टाकलं पंतप्रधान मोदींना मागे    title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चाहतावर्ग देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणावर आहे. फोर जी जमान्यातल्या ट्विटरवरही मोदींचे फॉलोअर्स काही कमी नाहीत. गेल्या वर्षी मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रं स्विकारल्यानंतर मोदींच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या तब्बल चौपटीनं वाढली आहे. 

गेल्यावर्षी ही संख्या सुमारे ४० लाख होती. ती आता थेट १ कोटी ६० लाख ४० हजार इतकी झाली आहे. विशेष म्हणजे शाहरुखच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या सध्या १ कोटी ६० लाख ५० हजार इतकी आहे. शाहरुखचे फॉलोअर्स हे मोदींच्या फॉलोअर्स पेक्षा १० हजारांनी जास्त आहे.

बिग बी अमिताभ बच्चन ट्विटर फॉलोअर्सच्या स्पर्धेत मात्र या दोघांपेक्षा चांगलेच पुढे आहेत. अमिताभ यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या तब्बल १ कोटी ८० लाख इतकी आहे. 2015 मधल्या भारतातल्या सर्वेक्षणातून सोशल मीडिया फोरमनं ही माहिती जाहीर केली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.