कमाईमध्येही शाहरूखच 'किंग'!, फोर्ब्सच्या यादीत पहिला

अभिनयासोबतच कमाई आणि लोकप्रियतेतही शाहरुख किंग असल्याचं समोर आलं आहे.

Updated: Jan 25, 2013, 03:07 PM IST

www.24taas.com, मुंबई
अभिनयासोबतच कमाई आणि लोकप्रियतेतही शाहरुख किंग असल्याचं समोर आलं आहे. भारतातल्या टॉप सेलिब्रिटीचं उत्पन्न आणि लोकप्रियतेच्या आधारावर जाहीर केलेल्या फोर्ब्सच्या यादीत शाहरुखनं पहिलं स्थान मिळवलं आहे...
२०२ कोटीची कमाई करत शाहरुख या यादीत अव्वलस्थानी राहिला आहे.. तर शाहरुखनंतर दंबग खाननही आपली दबंगई दाखवून दिलं आहे.. या यादीत सलमान दुसऱ्या स्थानी राहिला असून त्याची कमाई तब्बल १४५ कोटी रुपये इतकी आहे...टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोणीनं १३५ कोटी कमाईसह तिसरं स्थान मिळवलं आहे...
चौथ्या स्थानी खिलाडी अक्षय कुमार तर पाचव्या स्थानावर बिग बी अमिताभनं स्थान मिळवलं आहे... सचिन तेंडुलकर सहाव्या, करीना कपूर सातव्या स्थानावर आहे... तर वीरेंद्र सेहवागनं आठवं, विराट कोहलीनं नववं तर कतरिना कैफनं दहावं स्थान मिळवलं आहे..