`संघाचे तालिबानशी संबंध`, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

तालिबानी समर्थक नेत्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी भाजपनं स्पष्टीकरण देण्याची मागणीही मलिक यांनी केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 24, 2013, 06:23 PM IST

तालिबानी समर्थक नेत्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी भाजपनं स्पष्टीकरण देण्याची मागणीही मलिक यांनी केली आहे.
तालिबानी समर्थक नेते मौलाना फैजूल रेहमान यांच्यासोबत २००५ साली लालकृष्ण अडवाणी, रा स्व संघ आणि विहिप नेत्यांची दिल्लीच्या कार्यालयात गुप्त बैठक झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या बैठकीत काय झालं, ते उघड करावं, अशी मागणीही त्यांनी केली.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता. यावर त्यांची भाजप आणि इतर हिंदुत्ववादी पक्षांनी निंदाही केली होती. नवाब मलिक यांच्या आरोपांबद्दल विचारलं असता भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी एका राष्ट्रीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर असे आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या बुद्धिमत्तेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.