शिवराजसिंग चौहान यांना पोलिसांनी नेलं उचलून

उत्तर भारतामध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. मध्यप्रदेशमध्येही या पावसामुळे मोठं नुकसान केलं आहे.

Updated: Aug 21, 2016, 09:21 PM IST
शिवराजसिंग चौहान यांना पोलिसांनी नेलं उचलून title=

भोपाळ : उत्तर भारतामध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. मध्यप्रदेशमध्येही या पावसामुळे मोठं नुकसान केलं आहे. या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान गेले होते. या दौऱ्यामध्ये पूरग्रस्त गावाची भेट द्यायला शिवराजसिंग चौहान जात होते. या गावात जाताना असलेली नदी पार करताना पोलिसांनी शिवराजसिंग चौहान यांना उचलून घेतलं आणि गावामध्ये पोहोचवलं.   

उत्तर भारतातल्या या पूरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. याबरोबरच अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.