सावधान! पुरीचं जगन्नाथ मंदिर कधीही कोसळू शकतं

कोट्यवधी भारतीयांच्या आस्थेचं आणि चार धाम पैकी असलेलं पुरीचं जगन्नाथ मंदिर कधीही कोसळू शकतं.

Updated: May 18, 2016, 02:26 PM IST
सावधान! पुरीचं जगन्नाथ मंदिर कधीही कोसळू शकतं title=

नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांच्या आस्थेचं आणि चार धाम पैकी असलेलं पुरीचं जगन्नाथ मंदिर कधीही कोसळू शकतं. रिपोर्टनुसार भारतीय पुरातत्व खात्याच्या सर्वेत ओडिशातील जगन्नाथ पुरी मंदिर कधीही कोसळू शकतं असं सांगितलं जात आहे.

बीबीसीमधील एका रिपोर्टनुसार पुरातत्वच्या तंत्रज्ञानचे कोर समितीचे अध्यक्ष जीसी मित्रा म्हणतात, हे मंदिर हाय रिस्कवर आहे, हे कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, जर योग्य पावलं उचलली नाहीत, तर हजारो वर्ष पुरातन मंदिर उद्धवस्त होऊ शकतं.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पुरी जगन्नाथ मंदिराच्या दुरूस्तीसाठी केंद्राकडे मदत मागितली आहे. पटनायक यांनी म्हटलं आहे, मंदिरच्या खांब तडावले आहेत, यामुळे मंदिराच्या मुख्य इमारतीस धोका आहे.