प्रेम प्रकरणावरून दिग्गीराजांना छोट्या भावाच्या पत्नीने केले टार्गेट

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीव्ही अँकर अमृता राय हिच्याशी प्रेम संबंध आणि लग्नाच्या योजनेवर त्यांच्या कुटुंबातून टीका होत आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 2, 2014, 04:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीव्ही अँकर अमृता राय हिच्याशी प्रेम संबंध आणि लग्नाच्या योजनेवर त्यांच्या कुटुंबातून टीका होत आहे. दिग्विजय सिंह यांचे छोटे भाऊ आणि विदिशातून सुषमा स्वराज यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे लक्ष्मण सिंह यांची पत्नी रुबिना शर्मा सिंह यांनी सार्वजनिक नाराजी प्रकट केली आहे.
@rubyssingh ट्विटर हँडलवर करण्यात आलेल्या ट्वीट्समध्ये रूबीना म्हणतात, ` मी दिग्विजय सिंह यांच्याशी नाराज आहे. कारण त्यांनी त्यांच्या छोट्या भावाशी माझे लग्न होत असताना विरोध केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, मी लक्ष्मण सिंह यांच्या पेक्षा १३ वर्षांनी छोटी आहे आणि राजपूत ही नाही. आपल्या ट्वीट्समध्ये रुबिनाने दावा केला की त्या लक्ष्मण सिंह यांची पत्नी आहे.
दिग्विजय सिंह ६७ वर्षांचे असून त्यांची पत्नी आशा सिंह यांचे गेल्या वर्षी कॅन्सरने निधन झाले होते. अमृता राय यांचे वय ४३ वर्ष होते. दोघांमध्ये २४ वर्षांचे अंतर आहे. रुबिनाने अमृता आणि दिग्विजय यांच्या संबंधावर एक आणखी वादग्रस्त ट्वीट केले होते. पण नंतर ते काढून टाकण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.