आर्मी मॅनच्या मागे लागली नागिन, ७२ वेळा डसली

तुम्हांला विश्वास बसणार नाही. एका नागिण एका लष्कराच्या जवानाच्या मागे पडली की त्याला तब्बल ७२ वेळा डसली. हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील बल्हघाडीतील उनांद गावात राहणारे जवान इंद्र सिंग उर्फ ज्ञानू आता रिटायर झाले आहेत. यांची काहणी नाग-नागिन चित्रपटांसारखी आहे. 

Updated: Apr 8, 2015, 05:00 PM IST
आर्मी मॅनच्या मागे लागली नागिन, ७२ वेळा डसली title=

मंडी : तुम्हांला विश्वास बसणार नाही. एका नागिण एका लष्कराच्या जवानाच्या मागे पडली की त्याला तब्बल ७२ वेळा डसली. हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील बल्हघाडीतील उनांद गावात राहणारे जवान इंद्र सिंग उर्फ ज्ञानू आता रिटायर झाले आहेत. यांची काहणी नाग-नागिन चित्रपटांसारखी आहे. 

इंद्र यांनी सांगितले की, त्यांना सुरूवातील स्वप्नात साप दिसत होता. त्यानंतर एक सुंदर तरुणी दिसत होती. ती तरूणी घाबरवत होती. ती म्हणायची, तू ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी मी तुला चावा घेईल. स्वप्न पडल्यानंतर आठवडाभरानंतर इंद्र यांना साप दंश करत असे....

रिटायर जवान इंद्र सिंह यांना वर्षात तीन ते चार वेळा सर्पदंशांच्या वेदना सहन कराव्या लागतात. हे प्रकरण १९९१ पासून २०१० पर्यंत सुरू होते. १९९१ मध्ये इंद्रसिंग ड्युटीवर असताना सापाने दंश केला होता. त्यांतर यूपी, पुँछ, राजौरी आणि किनौरसह अनेक ठिकाणी ड्युटी केली, त्याठिकाणी त्यांना सर्प दंशाचा सामना करावा लागला. पण प्रत्येकवेळी इंद्रसिंह यांचे प्राण वाचतात हे विशेष...

एकदा फैजाबादमध्ये एका विषारी सापाने त्यांना दंश केला. त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यावेळी त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. शरीरात विष इतके पसरले की त्यांच्या वाचण्याची शक्यता कमी होती. पण जीवन मृत्यूच्या या संघर्षात जीवनाचा विजय झाला. 

त्यामुळे मानण्यात येते की इंद्र यांना डसणारी एक नागिन होती. इंद्र यांनी सांगितले की २०१०मध्ये रिटायर झाल्यावर ते नगवाईच्या ज्वाला माता मंदिरात पोहचले. 

इंद्र यांनी आपल्या घराजवळ कुल देवी नैना मातेचे मंदिर बांधले आणि त्या दिवसापासून आतापर्यंत त्यांना एकदाही नागिन डसली नाही, असे इंद्र सिंह यांनी सांगितले.

पण, इंद्र सिंग यांना एकच साप चावत असल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच मंदिर बांधल्यानंतर हे बंद झाल्याचे त्यांचा दाव्याबद्दल त्यांना जास्त बोलता आले नाही. त्यामुळे त्यांचा वरील अनुभव असू शकतो पण त्याला अंधश्रद्धेची जोड देणे चुकीचे आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.