सापाचं भय दाखवून महिलांवर गँगरेप करणारी टोळी

Updated: Aug 26, 2014, 02:33 PM IST
सापाचं भय दाखवून महिलांवर गँगरेप करणारी टोळी

हैदराबादः सापाचा आणि शस्त्राचा धाक दाखवून महिलांवर गँगरेप करणाऱ्या टोळीतल्या चौघांना पकडण्यात आलंय. महिला आयोगानं पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती आणि रिपोर्ट मागवलाय. 
गेल्या शुक्रवारी 18 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीच्या अटकेनंतर या टोळीची माहीती मिळाली. पोलिसांनी 26 वर्षीय जिम प्रशिक्षक फैसल दय्यानी आणि त्याच्या मित्र सलाम हामदी या दोघांना 18 वर्षीय मुलीला एका फॉर्म हाउसमध्ये नेवून 31 जुलैला तिच्यावर गँगरेप केल्याच्या आरोपात अटक केलीय.  
या प्रकरण्यामध्ये सात ऑगस्टला इतर चार गुन्हेगारांना अटक करण्यात आली. तर तीन गुन्हेगारांनी 11 ऑगस्टला न्यायालयात आत्मसमर्पण केलं. या गुन्हेगारांनी मुलीला साप तसंच शस्त्राचा धाक दाखवून तिच्या होणाऱ्या नवरासमोर तिच्यावर गँगरेप केला. 
मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनंतर आयोगानं हैदराबाद पोलीस आयुक्तांना या टोळीनं केलेल्या सर्व गुन्हांची विस्तृत माहिती सादर करायला सांगितलीय.   

Add Zee News as a Preferred Source

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

About the Author