www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळातल्या संभाव्य फेरबदलांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेली काँग्रेस कमिटीची बैठक संपलीये. या बैठकीत मंत्रिमंडळात 10 मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. तब्बल दोन तास ही बैठक सुरू होती. सरकार आर्थिक सुधारण्याच्या प्रयत्नात असल्याचे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले तर, भाजपची मात्र नकारात्मक भूमिका असल्याने अनेक निर्णय घेण्यात अडथळा येत असल्याचेही सांगण्यात आले.
तसच राहुल गांधींना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे अशी चर्चा आहे. सोनियांच्या 10 जनपथ या निवासस्थानी काँग्रेस कमिटीची बैठक होती. या बैठकीसाठी राहुल गांधी, शिला दीक्षित, जनार्दन द्विवेदी, अहमद पटेल, मुकुल वासनिक, गुलामनबी आझाद, विलास मुत्तेमवार हे काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, पक्षसंघटनेतील बदल आणि तेलंगणाच्या मुद्यावर पक्षाची भूमिका ठरवण्यात आल्याचं सांगण्य़ात य़ेतयं.