चंदीगड : 'अजान'च्या मुद्द्यावर सोनूला हायकोर्टाकडून क्लीन चीट मिळालीय.
मोहम्मद पैगंबरांनी जेव्हा इस्लाम धर्माची स्थापना केली होती तेव्हा वीज आणि मायक्रोफोनचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे 'अजान' हा धर्माचा भाग आहे... लाऊडस्पीकर नाही, अशी टिप्पणी पंजाब-हरियाणा हायकोर्टानं केलीय. या निर्णयामुळे प्रसिद्ध गायक सोनू निगम याला क्लीन चीट मिळालीय.
सोनू निगम यांच्या ट्विटच्या समीक्षेवरून त्यांनी अजानला नाही तर लाऊडस्पीकरच्या वापराला गुंडागर्दी म्हटल्याचं कोर्टानं म्हटलंय.
यापूर्वी सोमवारी न्यायमूर्ती एम एम एस बेदी यांनी सोनू निगम विरुद्ध याचिका धुडकावून लावली होती.
'मी मुस्लीम नाही आहे पण मस्जिदची अझान ऐकून रोज मला उठावं लागतं. कधी ही धार्मिक जबरदस्ती थांबणार आहे? मला वाटत नाही की कुठल्या देवळात, गुरुद्वारामध्ये वीजेचा वापर करून त्या धर्माचं पालन न करणाऱ्या लोकांना जबरदस्ती झोपेतून उठवलं जातं. ही तर गुंडागर्दी आहे' असं सोनूनं आपल्या ट्विटर अकाऊंटर म्हटलं होतं.