'इस्रो'कडून पाचव्या स्वदेशी दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्रोनं तयार केलेल्या स्वदेशी बनावटीच्या जीपीएस प्रणालीमधल्या पाचव्या उपग्रहाचं आज प्रक्षेपण पार पडलंय.

Updated: Jan 20, 2016, 02:29 PM IST

Embedded image permalink
IRNSS-1E

श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्रोनं तयार केलेल्या स्वदेशी बनावटीच्या जीपीएस प्रणालीमधल्या पाचव्या उपग्रहाचं आज प्रक्षेपण पार पडलंय. 

आज सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांनी स्वदेशी मिनी जीपीएस प्रणालीतील IRNSS-1E दिशादर्शक उपग्रहाचं अवकाशात उड्डाण पार पडलं. भारतीय उपखंडात अचूक स्थान - वेळ सांगण्याचे काम हे उपग्रह करतील.

IRNSS-1E हा उपग्रह PSLV - सी ३१ या अत्यंत भरवशाच्या रॉकेटच्या सहाय्यानं कक्षेत सोडलं गेलं. श्रीहरीकोटा इथून हे प्रक्षेपण पार पडलंय.

सध्या आपण वापरत असलेली ग्राऊंड पोझिशनिंग सिस्टिम, म्हणजेच GPS प्रणाली परदेशी आहे. मात्र इस्रोनं स्वतःची प्रणाली विकसित केलीय. सात उपग्रहांच्या क्लस्टरद्वारे ही प्रणाली काम करेल. 

याचा फायदा संरक्षण दल, आपत्कालीन व्यवस्थापन, वैज्ञानिक प्रयोग तसंच वाहतूक व्यवस्थापन, पुरातत्व विभाग, इथं याचा फायदा होईल. 

क्लस्टरमधले उर्वरित दोन उपग्रह फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाशात पाठवले जातील. आजच्या मोहीमेच्या यशानंतर PSLV या प्रक्षेपकाचं हे सलग ३१ वं यशस्वी उड्डाण आहे.