देहरादून : शक्तिमान या घोड्याचा पुतळा हटविण्याची नामुष्की उत्तराखंड सरकारवर ओढवली आहे. सोशल मीडियावरील वाढत्या टीकेमुळे घोड्याचा पुतळा हटवण्यात आला.
भाजप आमदाराच्या अमानुष मारहाणीत शक्तिमानचा मृत्यू झाला होता, त्याच्या स्मरणार्थ देहरादून येथे शक्तिमानची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत शक्तिमानचा पुतळा उभारण्यात आलेल्या पार्कचे उद्घाटन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच हा पुतळा हटविण्याची वेळ सरकारवर आली आहे. दरम्यान, आता पुतळा हटविल्यामुळे पुन्हा नव्याने टीकेला सुरूवात झाली आहे.
मात्र, शक्तिमानला अशाप्रकारे अवाजवी प्रसिद्ध दिल्याच्या कारणावरून सरकारवर सोशल मीडियावरून टीका सुरू होती. काही दिवसांपूर्वीच उत्तराखंडमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
तसेच शक्तिमानला अधिक महत्त्व देण्यात येत असल्याचा आक्षेप नेटिझन्सकडून घेण्यात येत होता, त्यामुळे शक्तिमानचा पुतळा रातोरात हटविण्यात आला.