नवी दिल्ली : भारतरत्न पुरस्काराचे यंदा पाच मानकरी असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं रिझर्व्ह बँकेच्या टाकसाळीत पाच स्मृतिचिन्हे बनवण्यास सांगितल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह आझाद हिंद सेनेचे सेनापती सुभाषचंद्र बोस यांना भारत रत्न सन्मान मिळण्याची शक्यता आहे.
तसेच बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदनमोहन मालवीय, प्रख्यात चित्रकार राजा रवी वर्मा आणि गीता प्रेसचे संस्थापक हनुमान प्रसाद पोद्दार यांना सन्मान दिला जाणार असल्याची चर्चा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.