सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचं गुढ कायम

भारतीय स्वातंत्र्यासाठी अभूतपूर्व योगदान देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओडीशाच्या कटक शहरात २३ जानेवारी १८९७ ला झाला. परंतु त्यांच्या मृत्यूचं गुढ जवळपास ७० वर्षांनी देखील एकरहस्यच राहीलं आहे. याच रहस्याची उकल करण्यासाठी गोपनीय कागदपत्र उघड करण्याची मागणी जोर धरत आहे.

Updated: Jan 26, 2014, 06:16 PM IST

www.24taas.com झी मीडिया , नवी दिल्ली
भारतीय स्वातंत्र्यासाठी अभूतपूर्व योगदान देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओडीशाच्या कटक शहरात २३ जानेवारी १८९७ ला झाला. परंतु त्यांच्या मृत्यूचं गुढ जवळपास ७० वर्षांनी देखील एकरहस्यच राहीलं आहे. याच रहस्याची उकल करण्यासाठी गोपनीय कागदपत्र उघड करण्याची मागणी जोर धरत आहे.
नेताजींशी संबंधीत कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी करण्यासाठी मोहीम चालवणारा आणि लेखक व माहीती अधिकार कार्यकर्ता अनुज धर यांच्या मते, राष्ट्रीय अभिलेखागारात ही गोष्ट समोर आली की नेताजींचा मृत्यू १९४५ मध्ये तैवान येथे विमान अपघातात झाला. तैवानच्या सरकारी कागदपत्रात १८ ऑगस्टला विमान अपघात झाल्याची नोंद नाही. सरकारला नेताजींच्या मृत्यूबाबतची माहीती उघड करावयची नाही, असा आरोप अनुज धर यांनी केला आहे.
१५० पेक्षा जास्त कागदपत्रे सरकारने जनतेपासून लपवून ठेवली आहेत. नेताजींची कागदपत्रे ही राष्ट्रीय संपत्ती आहे. नेताजींच्या मृत्यूसंबंधी तर्कवितर्काना विराम देण्यासाठी हे दस्ताऐवज सार्वजनिक करणं गरजेच आहे असे मत `मिशन नेता - एंड द सिक्रेसी` अभियान चालविणारे आलोक चक्रवर्ती यांनी व्यक्त केले आहे.
नेताजींच्या कुटुंबातील चंद्रकुमार बोस यांना नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ मध्ये तैवान येथे विमान अपघातात झाल्याचे मान्य नाही. परिस्थितीजन्य पुराव्यानुसार त्या दिवशी नेताजी रशियात होते. कोलकाता उच्च न्यायालयाने नेताजींच्या मृत्यूसंबंधी कागदपत्रे सार्वजनिक करण्यासाठी एका वेगळ्या समितीची स्थापना करण्याचा निर्णय दिला होता.
नेताजींच्या मृत्यूसंबंधी वेगवेगळे कयास लावले जातात. नेताजी १९४५ नंतरही जीवंत होते आणि रशियात शिक्षा भोगत होते, असंही एक मत व्यक्त केलं जातं. `जर माझे वडील जीवंत असते तर ते देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपल्या मायभूमीत परतले असते. त्यामुळे त्यांचा मृत्यू विमान अपघातात झाला असावा`, असं नेताजींच्या कन्या अनिता बोस यांनी म्हटलंय. त्यामुळे या महानायकाच्या मृत्यूचं गुढ आजही कायम आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.