काँग्रेसचे राजकारण सुरु आहे : भाजप

एका न्यायालयीन प्रकरणाचं काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय. 

PTI | Updated: Dec 19, 2015, 03:09 PM IST
काँग्रेसचे राजकारण सुरु आहे : भाजप title=

नवी दिल्ली : एका न्यायालयीन प्रकरणाचं काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वामींच्या आडून काँग्रेस नेतृत्वाला विनाकारण छळत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. त्याला उत्तर देताना कायद्यापुढे सर्व समान असल्याचं स्वामी म्हणालेत. आपल्याला काँग्रेसचेच दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांनी झेड दर्जाची सुरक्षा देऊ केली होती, असा दावाही त्यांनी केला.

नॅशनल हेराल्डप्रकरणी भाजप, मोदींच्या हस्तक्षेपामुळं कारवाई होत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तर हायकोर्टाच्या आदेशानुसार कारवाई होत असल्याचं भाजपनं म्हटलंय. 

दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्लीत नवं राजकीय अटकनाट्य रंगण्याची नांदी काँग्रेसच्या सूत्रांनी दिलीय. आज सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी पतियाला हाऊस कोर्टासमोर हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. यादिवशी दोन्ही नेते कोर्टासमोर हजर राहतील.

मात्र कोर्टानं जर जामीन घेण्यास सांगितलं, तर काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यासाठी अर्ज करणार नाही, असे संकेत पक्षातल्या सूत्रांनी दिलीय.  त्यामुळे आज राजधानीत होणाऱ्या कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष आहे.