नवी दिल्ली : केंद्र सरकारने गृहीणींना दुसऱ्यांदा धक्का दिलाय. आधी विनाअनुदानित सिलिंडरमध्ये वाढ केली होती. आता अनुदानित सिलिंडरच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली आहे.
विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 37.50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच विमान इंधन आणि जेट इंधानाच्या किंमतीतही वाढ करण्यात आल्याची घोषणा इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने केली आहे.
नव्या दराप्रमाणे 14.2 किलोचे अनुदानित सिलिंडर नवी दिल्लीत 430.64 रुपये, कोलकाता येथे 432.64 रुपये, मुंबईला 460.27 रुपये आणि चेन्नईला 418.14 रुपयांनी मिळेल.
तर विनाअनुदानित सिलिंडर नवी दिल्लीत 529.50, कोलकातामध्ये 551, मुंबईत 531 तर चेन्नईमध्ये 538.50 रुपयांनी मिळेल. ही वाढ मंगळवार मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.