नवी दिल्ली : साखरेचा भाव क्विंटलमागे 60 रूपयांनी वाढला आहे. सरकारकडून साखरेवर आयात शुल्क वाढवण्यात आलं आहे, हे शुल्क 40 टक्क्यांनी वाढवण्यात आलं आहे.
4 हजार 440 कोटी रूपयांचं अतिरिक्त व्याज मुक्त लोन उपलब्ध केल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली, या घोषणेनंतर प्रमुख ठोक बाजारात साखरात साखर क्विंटलमागे 60 रूपयांनी महागली आहे.
तसेच मोठ्या खरेदीदारांकडूनही साखरेची मागणी होत असल्यानेही साखरेचे भाव कडाडले आहेत.
जर पाऊस कमी पडण्याची चिन्हं दिसली, तर पुढील काही दिवसात साखर आणखी महागण्याची चिन्हं आहेत.
पाऊस कमी पडला तर ऊसाचं पिक मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. ऊस पिकाला सर्वाधिक पाणी लागतं असं सांगितलं जातं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.