'दाऊद कनेक्शन असणाऱ्या उद्योगपतीला गृहमंत्र्यांनी वाचविले'

केद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी कनेक्शन असणाऱ्या एका उद्योगपतीला चौकशीच्या कचाट्यातून वाचवल्याचा आरोप माजी गृहसचिव आमि भाजप नेते आर. के. सिंग यांनी केला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 14, 2014, 05:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
केद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी कनेक्शन असणाऱ्या एका उद्योगपतीला चौकशीच्या कचाट्यातून वाचवल्याचा आरोप माजी गृहसचिव आमि भाजप नेते आर. के. सिंग यांनी केला आहे.
दाऊदला भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून त्याला लवकरच भारतात आणण्यात येईल, असा दावा करणा-या सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता. त्याचवेळी तसा काहीही करार नसल्याने दाऊदला आणता येणार नाही, असं घुमजावही शिंदे यांनी केला. त्यामुळे त्यांचा दाऊदबाबतचा बार फुसका निघाल्याचे दिसून आलेय. दरम्याने नव्या आरोपामुळे शिंदे अडचणीत आले आहेत.
भाजपमध्ये नुकताच प्रवेश घेतलेल्या सिंग यांनी काही खासगी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान केलेल्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दरम्यान झालेल्या सट्टेबाजीप्रकरणी दिल्ली पोलीस मुंबईतील काही उद्योगपतींची चौकशी करणार होते. मात्र त्यातील एक उद्योगपतीचे दाऊदशी कनेक्शन होते, त्यामुळे शिंदेनी त्या प्रकरणात हस्तक्षेप करत त्या उद्योगपतीची चौकशी थांबवली, असे सिंग यांनी आरोप करताना म्हटले आहे.
भारताला अनेक गुन्ह्यात हव्या असलेल्या दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी भारत सरकार अमेरिकेतील एफबीआयच्या संपर्कात असून दाऊदला लवकरच भारतात आणले जाईल, हे शिंदे यांनी काही घोटाळ्यातील आरोपी असल्याचेही आर.के.सिंग यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर आपल्या मर्जीतील पोलीस अधिकारी महत्वाच्या पदांवर राहतील याची काळजीही शिंदेनी घेतली, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांच्यावरील आरोप काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. मात्र, याबाबत शिंदे यांनी अद्यापही भाष्य केलेले नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.