सुषमा स्वराज यांच्या बहिणीची संपत्ती - 33 करोड रुपये

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप उमदवार आणि केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची बहिण वंदना शर्मा यांच्याकडे तब्बल 33.06 करोड रुपयांची संपत्ती असल्याचं समोर आलंय. आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना वंदना यांनी आपली ही संपत्ती घोषित केलीय. 

Updated: Sep 26, 2014, 05:18 PM IST
सुषमा स्वराज यांच्या बहिणीची संपत्ती - 33 करोड रुपये title=

नवी दिल्ली  : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप उमदवार आणि केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची बहिण वंदना शर्मा यांच्याकडे तब्बल 33.06 करोड रुपयांची संपत्ती असल्याचं समोर आलंय. आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना वंदना यांनी आपली ही संपत्ती घोषित केलीय. 

‘साफिदो’ विधानसभा मतदार संघातून उतरलेल्या 49 वर्षांच्या वंदना यांनी मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापीठातून राजनैतिक विज्ञानात पीएचडी मिळवलीय.

वंदना यांनी घोषित केल्याप्रमाणे त्यांच्याकडे 31.41 करोड रुपये तर 1.65 करोड रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ज्यामध्ये त्यांचे डॉक्टर पती आणि दोन मुलांच्या संपत्तीचाही समावेश आहे. 

वंदना या नरवानामध्ये एसडी बालिका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत होत्या. 25 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी 2010 मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. त्यांचे पती डॉ. मनमोहन शर्मा यांचं खाजगी क्लीनिक आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.