चेन्नई : सेल्फी काढण्याच्या नादात जीव गमवावा लागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चेन्नईमध्ये पण असाच एक सेल्फी काढताना 16 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. दिनेश कुमार असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.
मागून येणाऱ्या भरदाव ट्रेनसोबत या मुलाला सेल्फी घ्यायचा होता, पण त्याचा अंदाज चुकला आणि त्याच्या अंगावरून ट्रेन गेली, यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
दिनेश हा चेन्नईच्या पुंथमल्ली इथला रहिवासी आहे. मित्रांबरोबर वेन्दालूर झू मधून परत येत असताना वेन्दालूर रेल्वे स्टेशन जवळ, त्याला एक ट्रेन येताना दिसली, तेव्हा त्यानं हा सेल्फी काढायचा विचार केला.