'द ग्रेट खली'चा आम आदमी पक्षाला पाठिंबा

डब्ल्यूडब्ल्यूईच्या आखाड्यातला भारताचा स्टार रेसलर ग्रेट खली आता राजकारणाच्या आखाड्यात उतरला आहे.

Updated: Aug 14, 2016, 06:11 PM IST
'द ग्रेट खली'चा आम आदमी पक्षाला पाठिंबा title=

चंदीगड : डब्ल्यूडब्ल्यूईच्या आखाड्यातला भारताचा स्टार रेसलर ग्रेट खली आता राजकारणाच्या आखाड्यात उतरला आहे. खली म्हणजेच दलीप सिंग राणानं आम आदमी पक्षाचे नेते सज्जन सिंग यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.   

याआधी पंजाबमधले भाजपचे राज्यसभेतले खासदार आणि माजी क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धूनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. सिद्धूही आम आदमी पक्षात प्रवेश करेल, असं बोललं जात आहे.