...हे 'महाराष्ट्र सदन' आहे की थ्री स्टार हॉटेल?

महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या लोकांसाठी स्वस्तात जेवण मिळण्याचं ठिकाण म्हणजे 'महाराष्ट्र सदन'... अशी ओळख आता संपुष्टात येणार आहे. 

Updated: Sep 19, 2015, 04:45 PM IST
...हे 'महाराष्ट्र सदन' आहे की थ्री स्टार हॉटेल? title=

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या लोकांसाठी स्वस्तात जेवण मिळण्याचं ठिकाण म्हणजे 'महाराष्ट्र सदन'... अशी ओळख आता संपुष्टात येणार आहे. 

कारण, नवीन महाराष्ट्र सदनातील कॅन्टीनचे दर थ्री स्टार हॉटेलप्रमाणे करण्यात आलेत. एव्हढंच नाही तर, त्यावर सर्विस टॅक्स लावल्यामुळं हे दर सामान्यांच्या खिशाला परवडणारेही राहिलेले नाहीत. दर अव्वाच्या सव्वा पटीनं वाढवण्यात आल्यानं लोकांनी महाराष्ट्र सदनातील कॅन्टीनकडे पाठ फिरवलीय. 

काही दिवसांपूर्वीच नवीन महाराष्ट्र सदनाच्या कॅन्टीनचे कंत्राट नागपूरच्या दर्शन पांडे यांना देण्यात आले. भाजप नेत्यांच्या जवळिक असल्यानं पांडे यांना कंत्राट मिळालं असलं तरी महाराष्ट्रातील पदार्थ स्वस्तात मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, दर मोठ्या प्रमाणावर वाढविल्यामुळे दिल्लीत राहणाऱ्या मराठीजनांचाही अपेक्षाभंग झालाय.

महाराष्ट्रातून फिरण्यासाठी येणारे मराठीजन, कामानिमित्त येणारे अधिकारी, राजकीय नेते, आमदार, खासदार, त्यांचे कार्यकर्ते यांची हमखास महाराष्ट्र सदनात मेजवाणी असे. परंतू मेनूकार्डमधील किंमती पाहून कॅन्टीनकडे अनेकांनी पाठ फिरवलीय. यामुळे, या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालावं आणि मनोरा आमदार निवास कॅन्टीनप्रमाणे 'महाराष्ट्र सदना'चेही दर असावेत, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. सोबतच, कमी दरातही यापूर्वीच्या कंत्राटदाराला परवडत होते मग नवीन कंत्राटदाराला का परवडत नाही? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी विचारलाय.  

'महाराष्ट्र सदना'तील पदार्थांचे सध्याचे दर... 
- थाळी - १२० + ८ रूपये सर्विस टँक्स = १२८ रूपये थाळी. (लिमिटेड जेवण. २ चपाती, डाळ, भात, दोन भाज्या)
- मटन बिर्यानी - ३३०
- व्हेज बिर्यानी - २००
- व्हेज पुलाव - १४०
- अंडा बिर्याणी - २२०
- अंडा करी - १५०
- मसाला भात - १२० 
- कढी भात - १४०
- पनीर बुरजी - २००
- पनीर टिक्का मसाला - १८०
- बटर चिकन ३००
- मटन मसाला ३६० 
- फिश करी - ३५०
- व्हेज हक्का नुडल - १६०
- व्हेज मन्च्युरिअर - १८०
- चिकन नुडल - २००

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.