रेल्वे रद्द झाली तर एसएमएसने प्रवाशांना माहिती

रेल्वे प्रवाशासांठी एक चांगली बातमी आहे. तुमची रेल्वे प्रवास करण्यापूर्वी रद्द झाली तर त्याची माहिती तुमच्या मोबाईलवर एसएमएसने मिळणार आहे. मात्र, तुम्ही आरक्षण केलेले हवे. ज्यांनी प्रवासाचे आरक्षण केलेय, त्यांनाच एसएमएस रेल्वे पाठवणार आहे.

Updated: Jun 26, 2015, 04:57 PM IST
रेल्वे रद्द झाली तर एसएमएसने प्रवाशांना माहिती title=

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशासांठी एक चांगली बातमी आहे. तुमची रेल्वे प्रवास करण्यापूर्वी रद्द झाली तर त्याची माहिती तुमच्या मोबाईलवर एसएमएसने मिळणार आहे. मात्र, तुम्ही आरक्षण केलेले हवे. ज्यांनी प्रवासाचे आरक्षण केलेय, त्यांनाच एसएमएस रेल्वे पाठवणार आहे.

प्रवासापूर्वी रेल्वे रद्द झाल्यास त्याचा एसएमएस प्रवाशाच्या मोबाईलवर पाठविण्याची सुविधा रेल्वेने सुरू केली आहे. या सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांना ते ज्या रेल्वेगाडीने प्रवास करणार आहेत, ती रद्द झाली तर त्याची माहिती मिळणार आहे. सध्या प्रायोगिक स्वरुपात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

अचानक किंवा एखाद्या घटनमुळे रेल्वेगाडी रद्द झाली की नाही, याची माहिती न मिळाल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ होतो. त्यामुळे अनेकवेळा असुविधेला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी एसएमएस पाठविण्याची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिलेय.

सध्या ज्या स्थानकावरून गाडी सुटणार आहे तिथपासून ज्यांनी आरक्षण केले आहे, त्यांनाच हा एसएमएस मिळणार आहे. लवकरच प्रवासाच्या दरम्यान येणाऱ्या इतर स्थानकावरून आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही असा एसएमएस पाठविण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.