www.24taas.com, नवी दिल्ली
संसदेत भाजपनं सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असला तरी दुसरीकडे मुलायम सिंहांनी मात्र विरोध दर्शवलाय. हे दोन्हा पक्षांना चर्चा नको असून हे सर्व काँग्रेस भाजपचं फिक्सिंग असल्याचा आरोप मुलायमसिंह यांनी केलाय.
संसदेच्या आजच्या कामकाजाची सुरूवातही गोंधळानेच झाली. कोळसाकांडावरून संसदेत गेल्या काही दिवसांत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच गरमागरमी सुरू आहे. याचाच परिणाम, संसदेच्या दोन्ही सभागृहात कामकाज होऊ शकलेलं नाही. कोळसाकांडप्रकरणी भाजप पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे. यावरूनच संसदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरत प्रचंड गोंधळ घातलाय.
भाजपच्या या रणनीतीला प्रत्युत्तर देण्यासाठी आज काँग्रेसचे काही दिग्गज नेते मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर भाजप पंतप्रधानांनी राजीनामा दिला नाही, तर प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. कोलगेट घोटाळाप्रकरणी सुबोधकांत सहाय, तसंच कोळसामंत्री श्रीप्रकाश जैस्वाल हे भाजपच्या निशाण्यावर आहेत.
एकीकडे संसदेत भाजपनं सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असला तरी दुसरीकडे मुलायम सिंहांनी मात्र विरोध दर्शवलाय. हे दोन्हा पक्षांना चर्चा नको असून हे सर्व काँग्रेस भाजपचं फिक्सिंग असल्याचा आरोप मुलायमसिंह यांनी केलाय. कामकाज चालू न देण्याच्या भाजपच्या भूमिकेविरोधात उद्या सपा, डावे आणि टीडीपी संसदेबाहेर धरणं आंदोलन करणार आहेत.