वाराणसी : भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त विधान केले आहे. सूर्यनमस्काराला विरोध करणाऱ्या नागरिकांनी बुडून मरावे, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
वाराणसीमध्ये आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी २१ जूनला असलेल्या योग दिनानिमित्त सूर्यनमस्काराला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
आदित्यनाथ म्हणाले, ‘‘ज्यांना सूर्यामध्ये ही सांप्रदायिक्ता दिसते त्यांनी समुद्रात बुडून मरावे. सूर्यनमस्कार घालणार नाहीत त्यांनी बंद खोलीत आयुष्य घालवावे. पूर्ण ब्रह्मांडासाठी सूर्य हा उर्जेचा स्त्रोत आहे. सूर्यनमस्काराला विरोध करणे हस्यास्पद आहे.
मुस्लिम संघटनांनी सूर्यनमस्कारा विरोध केला होता. काँग्रेसनेही योग दिनाला विरोध करत तुम्ही एखाद्यावर सक्ती करू शकत नाही, असे म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.