काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या हौतात्माला कारणीभूत असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलंय. 

Updated: Nov 24, 2015, 04:07 PM IST
काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा title=

श्रीनगर : शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या हौतात्माला कारणीभूत असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलंय. 

जम्मू काश्मीरमध्ये सोमवारी दहशताद्यांशी अनंतनाग आणि कुपवाडा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत, चार दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं ठार मारलं. अनंतनागमधल्या चकमकीत लष्करानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. तर कुपवाडामधल्या चकमकीत, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. गेल्या अकरा दिवसांपासून या घुसखोरांविरोधात लष्करानं मोहिम उघडली आहे. 

यामध्ये तीन हिज्बुल मुजहिद्दीनचे सदस्यांचा समावेश आहे. सरताज अहमद लोन, आदिल अहमद शेख आणि तनवीर अहमद भट अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत. 

दरम्यान या चकमकीत लेफ्टनंट कर्नल दर्जाचा अधिकारी आणि दोन जवान जखमी झाले. त्याचवेळी सीमेपलिकडून शस्त्रसंधीचं सोमवारी उल्लंघन केलं गेलं. यात एक भारतीय जवान शहीद झाला. याच मोहिमे दरम्यान १३ नोव्हेंरला कर्नल संतोष महाडिक यांनी कुपवाड्याच्या जंगलात याच दहशतवाद्यांना शोधताना आपले प्राण गमावले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.