हरियाणामध्ये रेल्वे अपघातात एक ठार, १०० जखमी

हरियाणाच्या पलवल भागात दोन रेल्वे एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात रेल्वे ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच १०० प्रवासीही जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

Updated: Dec 8, 2015, 11:33 AM IST
हरियाणामध्ये रेल्वे अपघातात एक ठार, १०० जखमी title=

नवी दिल्ली : हरियाणाच्या पलवल भागात दोन रेल्वे एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात रेल्वे ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच १०० प्रवासीही जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

मंगळवारी सकाळी दादर-अमृसर एक्सप्रेस दिल्लीच्या दिशेने येत होती. त्याचवेळी पलवल आणि असावटी स्टेशनदरम्यान येत असलेल्या ईमयू शटल आणि दादर-अमृतसर एक्सप्रेसची एकमेकांना धडक बसली. या अपघातामुळे दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय.

दरम्यान, या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.