हैदराबादेत सेक्स रॅकेट उघड, अभिनेत्री अटकेत

पोलिसांनी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मोतीनगर भागात छापा टाकून सेक्स रॅकेट उघड केलं आहे. पोलिसांनी छापेमारी दरम्यान दलालांसह एका टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीलाही अटक केली आहे.

Updated: Nov 27, 2014, 12:25 PM IST
हैदराबादेत सेक्स रॅकेट उघड, अभिनेत्री अटकेत

हैदराबाद : पोलिसांनी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मोतीनगर भागात छापा टाकून सेक्स रॅकेट उघड केलं आहे. पोलिसांनी छापेमारी दरम्यान दलालांसह एका टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीलाही अटक केली आहे.

दक्षिण भारतातील टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या या अभिनेत्रीला पोलिसांनी एका अपार्टमेंटमधून अटक केली. स्वातीने प्रसिद्ध टीव्ही सिरीयल कुमकुमा पुव्वू मध्ये काम केलं आहे, गोपनीय माहितीवरून पोलिसांनी फ्लॅटवर छापेमारी केली.

 या अपार्टमेंटमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, यावरून छापामारी केल्यानंतर पोलिसांनी टीव्ही कलाकार स्वातीला अटक केली आहे.

सेक्स रॅकेटमध्ये टीव्ही अॅक्ट्रेसला अटक झाल्यानंतर शहरात खळबळ उडली आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यवसाय मागील पाच महिन्यापासून सुरू होता. या आधी अभिनेत्री श्वेता बासुला अटक झाल्यानंतर हे दुसरं सेक्स रॅकेट बाहेर आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.