कानपुर : कानपुरमधील शिवली येथील सुरजपुर बैरी सवाई गावातील दोन वर्षाच्या मुलाच्या डोक्याचा आकार सामान्य माणासाच्या डोक्याहून दुप्पटीने मोठा आहे. रौनक असे या चिमुकल्याचे नाव आहे.
ज्या वयात मुले खेळतात, बागडतात त्या वयात मात्र रौनकला मोठ्या डोक्यामुळे अंथरुणावर पडून रहावे लागले. त्याच्या या आजारावर डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी एक लाख रुपये इतका खर्च सांगितलाय. मात्र इतका खर्च न जमल्याने रौनकचे ऑपरेशन होऊ शकले नाही.
अमित आणि अनुपमा या जोडप्याला दोन वर्षांपूर्वी पुत्ररत्नाचा लाभ झाला. जन्माच्या वेळेसही रौनकच्या डोक्याचा आकार सामान्य माणासाच्या डोक्यापेक्षा मोठाच होता. मात्र वय वाढत गेले तसतसे डोक्याचा आकारही वाढू लागला. रौनकचे वजन 12 किलोग्रॅम आहे मात्र त्याच्या डोक्याचा आकार सामान्य माणसाच्या डोक्याच्या आकाराहून मोठा आहे.
दरम्यान, रौनकला हायड्रोसिफलेस नावाचा आजार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वयस्क माणसाच्या डोक्याचा आकार साधारण 50-52 सेंटीमीटर इतका असतो. दोन वर्षाच्या मुलाच्या डोक्याचा आकार 40-45 सेंटिमीटर इतका असतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.