नितीश कुमार यांनी घेतली बिहार मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारमध्ये भाजप विरोधात महाआघाडी स्थापन करत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाने मोठे यश संपादन केले. आज  दुपारी २ वाजता नितीश कुमार यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला अनेक बडे नेते उपस्थित होते.

Updated: Nov 20, 2015, 06:37 PM IST
नितीश कुमार यांनी घेतली बिहार मुख्यमंत्रीपदाची शपथ  title=

दुपारी २.१६ वाजता
पाटणा : राजद नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी घेतली शपथ

दुपारी २.१५ वाजता
पाटणा : लालू प्रसाद यादव यांचा दुसरा मुलगा तेज प्रतात यादवने घेतली मंत्रीपदाची शपथ. मात्र चूक झाल्याने पुन्हा थपथ घ्यावी लागली

दुपारी २.१० वाजता
पाटणा: लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी प्रसाद यादव घेतली मंत्रीपदाची शपथ. शपथविधीसाठी बड्या-बड्या नेत्याची उपस्थिती

दुपारी २.०५ वाजता
पाटणा: गांधी मैदानात नितीश कुमार यांनी पाचव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ.

दुपारी १.४५ वाजता
पाटणा : केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू शपथविधी सोहळ्यासाठी गांधी मैदानात पोहोचले

दुपारी १.३६ वाजता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही उपस्थित

दुपारी १.३५ वाजता
थोड्याच वेळात होणार नितीशकुमार यांचा शपथविधी सुरू

दुपारी १.३३ वाजता
पाटणा : नीतिशकुमार गांधी मैदानात पोहोचले

 

 

नितीश कुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, अनेक बडे नेते राहणार उपस्थित

पाटणा : बिहारमध्ये भाजप विरोधात महाआघाडी स्थापन करत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाने मोठे यश संपादन केले. आज  दुपारी २ वाजता नितीश कुमार पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

नितीश कुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, अनेक बडे नेते राहणार उपस्थित

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी, जीतनराम मांझी यांच्यासह अनेक बडे नेते नितीश कुमार यांच्या शपथविधीला उपस्थित असतील.

नितीश कुमार मंत्रिमंडळाचा शपथविधी गांधी मैदानात हा होणार आहे. राज्यपाल रामनाथ कोविंद नितीश कुमार यांना बिहारचे ३४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ देतील. तर उपमुख्यमंत्री म्हणून संयुक्त जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव शपथ घेणयाची शक्यता आहे. नितीश कुमार मंत्रिमंडळात २८ - ३० मंत्री असतील. यात १२ जेडीयू-आरजेडी आणि चार काँग्रेसचे मंत्री असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मागील दोन वर्षात दोनवेळा या मैदानात अप्रिय घटना घडल्या. त्यामुळे येथे सुरक्षा मोठया प्रमाणावर तैनात करण्यात आली आहे. नितीश कुमार ज्या मंचावरून शपथ घेतील. तिथेच ज्येष्ठ तसेच अतिमहत्त्वाच्या नेत्यांना बसण्याची जागा केली गेलेय. बाजुला दुसरा मंडप लावला आहे. त्यात सर्व निवडून आलेले आमदार उपस्थित असतील.

याच मैदानातून तीन महिन्यांपूर्वी जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महाआघाडीची घोषणा करून भाजप विरोधात दंड थोपटले होते. आता रणसंग्राम संपला तरी नव्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. विजयी महाआघाडीचा सीएम शपथविधी याच मैदानात होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.