यूपीत आणखी ५ पेट्रोलपंपावर छापे, २ जणांना अटक

पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये STF ने हे प्रकरण समोर आणलं होतं. STF च्या टीमने आज आणखी ५ पेट्रोलपंपवर धाड टाकत पेट्रोलपंपावरील मशीनी तपासल्या. लखनऊमध्ये गुरुवारी रात्री देखील ७ पेट्रोल पंपांवर छापे मारण्यात आले होते. त्यामध्ये  पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांना चुना लावत असल्याचं समोर आलं होतं.

Updated: May 1, 2017, 07:19 PM IST
यूपीत आणखी ५ पेट्रोलपंपावर छापे, २ जणांना अटक title=

मुंबई : पेट्रोल पंपवर डिवाईस लावून पेट्रोलची हायटेक चोरी करण्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये STF ने हे प्रकरण समोर आणलं होतं. STF च्या टीमने आज आणखी ५ पेट्रोलपंपवर धाड टाकत पेट्रोलपंपावरील मशीनी तपासल्या. लखनऊमध्ये गुरुवारी रात्री देखील ७ पेट्रोल पंपांवर छापे मारण्यात आले होते. त्यामध्ये  पेट्रोल पंपवरील मशीनमध्ये चिप आणि रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून ग्राहकांना चुना लावत असल्याचं समोर आलं होतं.

ग्राहकांनी एक लीटर पेट्रोलची किंमत मोजून 940 ते 950 एमएल पेट्रोलच मिळत होतं. म्हणजे लीटरमागे 50 ते 60 एमएल पेट्रोलची चोरी होत होती. रोज 40 ते 50 हजार रुपये यातून हे कमवत होते म्हणजेच महिण्याला 12 ते 15 लाख रुपये लोकांना फसवून हे कमवत होते. आज केलेल्या कारवाईमध्ये २ जणांना अटक करण्यात आली आहे.